रत्नागिरी आर्मी संस्थेतर्फे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

0

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. अशा वेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी येत्या ३१ मार्च रोजी रत्नागिरी आर्मीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी आर्मी तयार झाली असून सुदृढ समाजासाठी ही आर्मी काम करते. याच भावनेतून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन रत्नागिरी आर्मीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करून शिबिर घेतले जाणार आहे. येत्या मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मारुती मंदिर येथे स्वा. सावरकर नाट्यगृहात हे रक्तदान शिबिर होईल. नियमित रक्तदान करणाऱ्यांनी आणि ज्यांना रक्तदान करून तीन महिने पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तींनी शिबिरात सहभागी व्हावे. शिबिरात एका वेळी तीन ते चार जणांना रक्तदानासाटी घेतले जाणार आहे. इच्छुकांना रक्तदान करण्यासाठी येण्याची वेळ सांगण्यात येईल. डायबेटिस, ब्लड प्रेशर इत्यादी आजार असल्यास किंवा कोणतीही गोळी चालू असल्यास त्यांनी या शिबिरात सहभागी होऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली नावे ९४२२००३१२८ या क्रमांकावर कळवावीत, असे आवाहन रत्नागिरी आर्मीकडून करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here