पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

0

नवी दिल्ली : ख्यातनाम ॲथलिट पी. टी. उषा, संगीतकार इलयराजा, कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र प्रसाद या चार नामवंतांची मोदी सरकारने राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली आहे.

हे चारही मान्यवर दक्षिण भारतातील आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तेलंगणातील हैदराबादमध्ये नुकतीच बैठक झाली. दक्षिण भारतातील राज्यांवर यापुढे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरविले होते. त्यावर या बैठकीने शिक्कामोर्तब केले.

पंतप्रधान यांच्याकडून अभिनंदन
पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र राव हे आंध्र प्रदेशचे असून बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजानसारख्या चित्रपटांशी त्यांचे नाव जोडलेले आहे. प्रख्यात ॲथलिट पी. टी. उषा या केरळ तर संगीतकार इलयराजा हे तामिळनाडू, वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकमधील मूळ रहिवासी आहेत. नामनियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल चौघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here