जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका: प्रारूप मतदारयाद्यांची १८ जुलैला प्रसिद्धी

0

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदारयाद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली
जिल्ह्यात या निवडणुका होणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून २२ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या २९ जुलै रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here