लॉकडाऊन पुढे तसेच सुरु ठेवण्याचा अद्याप कोणताही विचार नाही; केंद्र सरकारकडून खुलासा

0

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन हे पुढे तसेच सुरु ठेवण्याचा विचार अद्याप सरकारकडून करण्यात आलेला नाही. याबाबत उगाच अफवा पसरवू नये, असे कॅबिनेट सचिन राजीव गौबा यांनी माध्यमांना सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता काही सध्याच्या घडीला सुरु असणारं २१ दिवसांचं लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवणार असल्याच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला. पण, थेट केंद्राकडूनच या चर्चा नाकारण्यात आल्या. सचिन राजीव गौबा यांनी सोमवारी लॉकडाऊन वाढवणार असल्याच्या या चर्चा परतवून लावल्या. ‘ही सारी माहिती, हे अहवाल पाहून मी थक्कच होत आहे. लॉकडाऊनचा काळ वाढवण्याचा कोणचाही विचार तूर्तास नाही’, असं गौबा म्हणाले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:05 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here