कोमसाप रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी तेजा मुळ्ये यांची निवड

0

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी तेजा मुळ्ये, महिला अध्यक्षपदी आकांक्षा भुर्के आणि युवक अध्यक्षपदी दुर्गेश आखाडे यांची निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी शाखेची बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी तेजा रवींद्र मुळ्ये यांची, कार्याध्यक्षपदी चंद्रमोहन देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शंकर कदम यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये सचिवपदी सुनील एकनाथ चव्हाण, सहसचिवपदी हुसेन कादर पठाण, खजिनदारपदी विद्याधर लक्ष्मण कांबळे, सहकोषाध्यक्षपदी संजय बाळकृण कुळ्ये, जिल्हा प्रतिनिधीपदी आनंद शेलार यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आकांक्षा निगुडकर, मनोजकुमार खानविलकर, राजेंद्र चव्हाण, विजय साळवी यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी सुभाष भडभडे, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर, गणेश गुळवणी, सुनेत्रा जोशी, डॉ. दिलीप पाखरे यांनी निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here