आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील निबंध स्पर्धेत प्रगती शिंदे प्रथम

0

रत्नागिरी : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रगती संजय शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी- ”आदर्श कल्याणकारी राजा”, आज शिवाजीराजे असते तर….., सफर गडकिल्ल्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय कौशल्ये असे चार विषय देण्यात आले होते. स्पर्धेत ४२ विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले होते. स्पर्धेतील दुसरा क्रमांक प्राजक्ता दत्ताराम पेंढारी, तर तिसरा क्रमांक शुभम संतोष भागडे याने पटकावला.

स्पर्धेचे परीक्षण राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण जोशी, प्रा. मयूरेश राणे आणि प्रा. अभिनय पातेरे यांनी मेहनत घेतली.

सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here