‘ज्ञानदीप’मध्ये संगीत शिक्षण कार्यशाळा

0

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज येथे दि.२९ रोजी संगीत शिक्षण या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा झाली.

ज्ञानदीप महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व आयक्युएसी विभाग यांच्यातर्फे संगीत शिक्षण या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सखाराम साने यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी संगीत शिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संगीताचे विविध प्रकार, राग, स्वर याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या भजन गायनातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रा. संजोग जाधव तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले.

सखाराम साने यांचे स्वागत विभाग प्रमख प्रा. धनश्री आंब्रे यांनी केले. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. इख्तिसाम वावघरकर यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here