कोरोना पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केली ११ विशेष सबलीकरण गटांची स्थापना

0

नवी दिल्ली : भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत एक हजार १३९ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. तर देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३० वर पोहचला आहे. याच संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे. पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. दुसर्‍या गटाकडे देशातील रुग्णालये, अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन) कक्षांची उपलब्धता तसेच आजाराचा प्रादुर्भाव किती वाढत आहे, चाचण्या आणि आपत्कालीन उपचार केंद्रे यांच्यासंदर्भात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर आरोग्य उपकरणे, रुग्णांच्या जेवणाची आणि औषधांची सुविधा, खासगी क्षेत्रातील रुग्णालये, मदत करणार्‍या कंपन्या आणि सेवाभावी संस्थांशी समन्वय ठेवणे, लॉकडाउनसंदर्भातील विषयांकडे लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गटांची स्थापना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here