जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा मुबलक साठा असून अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने बंद नाहीत. तरी विनाकारण काही लोक बाहेर पडत पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही गर्दी थांबवा, कठोर पावले टाकायला भाग पाडू नका, असा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे. ते पुढेही काही दिवस कायम ठेवत घरात राहा. तसेच कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे, शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
