रेल्वे तिकिटांचा संपूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार : रेल्वे प्रशासन

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत रेल्वेगाड्या आणि तिकीट आरक्षण सुविधा रद्द केल्यामुळे २१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या प्रवास कालावधीतील सर्व प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा संपूर्ण परतावा देण्यात येणार आहे. दि. २७ मार्चपूर्वी तिकिटे रद्द केली असल्यास प्रवाशाने उर्वरित परतावा रकमेसाठी फॉर्म भरून त्यासोबत प्रवासाचा तपशील आणि तिकीट पावती २१ जूनपर्यंत कोणत्याही विभागीय रेल्वे मुख्यालयातील मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक किंवा मुख्य दावे अधिकारी यांच्याकडे सादर करावा. प्रवाशांना यावेळी एक पावती दिली जाईल ज्याद्वारे प्रवाशी अशी तिकिटे रद्द केल्यानंतर कापण्यात आलेल्या शुल्काची भरपाई मिळवण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. ई तिकिटांच्या बाबतीत २७ मार्चपूर्वी तिकिटे रद्द केली असल्यास उर्वरित परताव्याची रक्कम प्रवाशाच्या, त्याने ज्या खात्यातून तिकीट आरक्षित केले होते त्या खात्यात जमा केली जाईल, असे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:26 AM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here