आंबा वाहतुकीला कोकण रेल्वेचा मदतीचा हात

0

रत्नागिरी : आंब्यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत केली जाणार असून त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी मालवाहतूक चालवत आहे. विशेष गाड्यांची मागणी कायम राहिल्यास कोकण रेल्वेमार्फत भारतीय रेल्वेवरील विविध स्थानकांकरिता विशेष पार्सल गाडी चालविली जाणार आहे. या पार्सल गाडीत औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आंब्यासारख्या इतर नाशवंत वस्तूंचा समावेश असेल. आंबा बागायतदारांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यंनी वरिष्ठ कमर्शियल मॅनेजरशी ९००४४७०३९४ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय कोकण रेल्वेच्या पार्सल कार्यालयांशी संपर्क साधून अधिक माहिती घेता येऊ शकेल, असेही कळविण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:42 AM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here