जिल्ह्यातील बंदरांवर सुरक्षा रक्षकांचा २४ तास कडक पहारा

0

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर मत्स्यविभागाने सागरी सुरक्षा रक्षक यांच्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत बंदरावर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मिरकरवाडा, भगवती बंदर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मासळी उतरवण्याच्या बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरीही मुंबईतून सागरी मार्गाचा वापर करून बोटीने काही लोक कोकणात येत आहेत. हे रोखण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक हे २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरी विभागामध्ये कोरोनाचा प्रसार थांबवणे व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी काम करत आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी एन. व्ही. भादुले, रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, परवाना अधिकारी रत्नागिरी डॉ. रश्मी आंबुलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार सुदय करगुटकर हे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:54 AM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here