पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला विकास मंच

0

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला विकास मंचाचे उद्घाटन करण्यात आले.

हा कार्यक्रम महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. प्रभारी प्राचार्य पी. ए. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनसे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, सामाजिक कार्यकर्त्या वैभवी जानवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रास्ताविकात प्रा. सौम्या चौघुले यांनी महाविद्यालयातील महिला विकास कक्षाची आवश्यकता स्पष्ट केली. यावेळी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सहकार्यातून विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन देण्यात आले. महिला विकास कक्षाची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सना दळवी हिचा सत्कार करण्यात आला.

प्रभारी प्राचार्य देसाई यांनी महाविद्यालयातील महिला विकास कक्ष अधिकाधिक सफल कसा होईल, याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कोमल झिंबर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here