आ. राजनजी साळवी यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. उदय सामंत यांच्या सहकार्याने लांजा-कुवे नगरपंचायत परिसरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणीला सुरुवात

0

लांजा : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा बीमोड करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असतानाच आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी येथील जी.एस.डब्ल्यू एनर्जी दिलेल्या अग्निशमन गाडीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी लांजा-कुवे नगरपंचायत हद्दीमध्ये फवारणी करण्याची सुरुवात करण्यात आली तसेच त्याचाच एक भाग लांजा-कुवे नगरपंचायत परिसरामध्ये सर्वत्र कीटकनाशक फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्याचे काम लांजा-कुवे नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून जोरदार चालू आहे. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख संदीप दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, लांजा पोलीस उप निरीक्षक संजय चौधर, नगरसेवक स्वरूप गुरव, लल्या कुरूप, प्रसाद डोर्ले, पप्पू मुळे, रामचंद्र काडगाळकरयांच्या सह मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वॉर्ड मधील नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:36 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here