गावठी दारू बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : संसर्गजन्य रोग कोरोना पसरवण्याचा संभव असूनही एकत्र येत स्वतःजवळ बेकायदेशीरपणे एक लिटर गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार २८ मार्च रोजी सकाळी ९.३० वा.सुमारास कुर्ली येथे घडली. संजय रामचंद्र देसाई (६०, रा. कसोप,रत्नागिरी) आणि विश्वनाथ पशुराम तोडणकर (रा.कुर्ली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शनिवारी सकाळी विश्वनाथ तोडणकर याने संजय देसाईला बेकायदेशीरपणे दारू विक्री केली. तसेच या दोघांनी संसर्गजन्य रोग पसरण्याचा संभव असूनही असे करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:31 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here