मानेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांना मॅकमिलन एज्युकेशनतर्फे सेवांतर्गत प्रशिक्षण

0

रत्नागिरी : कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये सर्व शिक्षकांसाठी मॅकमिलन एज्युकेशनतर्फे नुकतेच सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये ‘वर्ग व्यवस्थापन’ आणि ‘संभाषण कौशल्य विकास’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणांतर्गत विविध कृती व उपक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी सुरत येथील प्रशिक्षक ए.ए. डाॅक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला.

हे प्रशिक्षण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी निगडीत असल्याने सर्व शिक्षकांसाठी खूपच उपयुक्त ठरले. प्रशिक्षणाच्या वेळी प्रशिक्षकांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. डॉक्टर यांनी वर्ग अध्यापनात उपलब्ध नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून दिला.
शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांनी प्रशिक्षक ए.ए.डाॅक्टर आणि सहकारी सुनील घोरपडे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अशाप्रकारच्या प्रशिक्षणामार्फत बदलत्या शैक्षणिक पद्धतींची माहिती मिळते. म्हणून असे प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल सर्व शिक्षकांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तृष्णाली शिगवण, वैभव जाधव, शर्वरी मिरगल, गौरव सुर्वे आदींनी सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:46 PM 11-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here