लॅटव्हियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा मदतीचा हात

0

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा येथे भारतातील ३७ विद्यार्थी असून महाराष्ट्रातील ८ विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवरून संपर्क केला होता. याची तात्काळ दखल घेत श्री. सामंत यांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना जीवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी मदत करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, शासन आपल्याला मदत करेल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:13 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here