इंटरनेटवरचा लोड कमी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा स्टेट्स टायमिंगमध्ये बदल

0

कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामुळं लोक घरातंच बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत जगाशी संपर्क साधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. याचा परिणाम इंटरनेट स्पीडवर होत आहे. इंटरनेटवर वाढलेला लोड कमी करण्यासाठी युट्यूब, नेटफ्लिक्स यांसह अनेक वेबसाइटनं याआधीच बिटरेट आणि कमी रिझोल्यूशनमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, व्हॉटसअॅपनेही त्यांच्या एका फीचरमध्ये मोठा बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या स्टेट्सच्या टायमिंगमध्ये बदल केला आहे. युजर्स पुर्वी स्टेट्समध्ये 30 सेंकदांचा व्हिडीओ टाकू शकत होते. मात्र आता भारतीय युजर्सला केवळ 15 सेंकदांचा व्हिडीओ टाकता येणार आहे. यामुळे सर्व्हरवरील दबाव कमी होईल.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:14 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here