पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये – शालेय शिक्षणमंत्री

0

एकिकडे राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:20 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here