शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाची कार्यकारिणी जाहीर

0

रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी रवींद्र इनामदार तर सचिवपदी गणपती एडवी यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी विनायक हातखंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

माजी विद्यार्थी मंडळाची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कोषाध्यक्ष-विजय वाघमारे, सदस्य-रवींद्र पाटणकर, अनंत जाधव, रेखा इनामदार, अस्मिता मजगावकर, संदीप कांबळे, संतोष गार्डी, निनाद तेंडुलकर, संदेश रहाटे, रजनी पेजे, पूजा कात्रे. सल्लागार – विनायक हातखंबकर, चंद्रमोहन देसाई, समन्वयक -डॉ. तारासिंग नाईक, मानद अध्यक्ष म्हणून प्राचार्या-डॉ. रमा भोसले यांची निवड करण्यात आली. मंडळ गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहील.

शिक्षकांसाठी उदबोधन वर्गाचे आयोजन, क्रीडास्पर्धा आणि इतर उपक्रम राबविले जातील, असे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी सांगितले. सचिव गणपती एडवी यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 12-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here