शेतकऱ्यांनी कमी किमतीला काजूबी विकू नये; आ. शेखर निकम यांचे आवाहन

0

रत्नागिरी : कोकणातील मुख्य व जास्त उत्पादन असलेल्या काजू फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी करोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे काजूबीच्या विक्रीची काळजी करू नये. कमी किमतीत कोणीही काजूबीची विक्री करू नये, असे आवाहन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले आहे. काजूबी नाशवंत नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जायची आवश्यकता नाही. आपल्याकडील काजूबी चांगल्या पद्धतीने सुकवून साठवून ठेवावी. गेल्या तीन वर्षांपासून काजू उद्योगाची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यात सध्याच्या संचारबंदीचे संकट आले आहे. मात्र ही परिस्थिती थोडी निवळल्यानंतर काजू उत्पादक शेतकरी, काजू प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. तोपर्यंत काजूबी कमी किमतीला विकू नये, असे आवाहन निकम यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:58 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here