घरगुती गॅस सिलेंडर सेवा विना अडथळा सुरू राहील; इंडियन ऑइलकडून खुलासा

0

लॉकडाऊनच्या दिवसापासूनच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, नागरिक अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देखील लोकांना घाबरून जाऊन गॅस सिलेंडर बुक न करण्याचे आवाहन केले होते. मात्र लोकांनी या आवाहनला प्रतिसाद न दिल्याने कंपनीने बुकिंगसाठी निश्चित कालावधी ठरवला आहे. याआधी घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांच सक्ती नव्हती. मात्र आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने निर्णय घेतला आहे की, 15 दिवसांच्या अंतरानेच घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग करता येईल. कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी देखील नागरिकांना या परिस्थिती घाबरू नये, ही सेवा विना अडथळ्याशिवाय सुरू राहील. तसेच देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:39 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here