“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…”; गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचं खास ट्विट

0

मुंबई : आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केलं आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच” असं म्हटलं आहे.

“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…” असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे. मी एक सामान्य शिवसैनिक आहे, मुख्यमंत्रिपद माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी वाटेला आले तर सोडतही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठणकावून सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 13-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here