शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर मतदारसंघात दाखल; अधिकाऱ्यांची घेतली झाडझडती

0

सिंधुदुर्ग : राज्यात घडलेल्या सत्तांतरच्या नाट्यानंतर बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर हे मंगळवारी आपल्या मतदार संघात सावंतवाडी येथी दाखल झाले.

सावंतवाडी तालुक्यात राहिलेली कामी बाहेरचे ठेकेदार घेऊन पूर्ण करा, सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आल्या आल्या केसरकर यांनी लगेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात घेतली. तीन तीन वर्ष कामे होत नाहीत. हे खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. दिला.

म्हणाले, तुमच्या वेळ काढू धोरणामुळे आंदोलनकर्ते आमची लाज काढतात. त्यामुळे येत्या चार दिवसात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते दुरुस्त करा, अन्यथा तुम्ही इथे दिसणार नाहीत, अशा कठोर शब्दात आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांची झाडझडती घेतली.

दरम्यान सावंतवाडी बस स्थानकाची परिस्थिती सुद्धा तात्काळ बदलावी, तसेच शाळकरी मुलांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी एसटी महामंडळाने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ते पुढे म्हणाले, निधी देऊन सुद्धा अधिकारी काम करत नसल्यामुळे आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर आंदोलन उपोषण केल्यानंतर ही कामे झाली की त्यांना आपल्यामुळेच काम मार्गी लागले असे वाटते. तसे श्रेय घेऊन ते जनते पुढे आमची लाज काढतात, त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रखडलेली विकास कामे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच रस्त्यांची दुरुस्ती करावी. येत्या चार दिवसात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी या ठिकाणी दिसणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला. तर जिल्ह्यातील बस स्थानकांना माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मोठा निधी दिला होता. मात्र तो योग्य रीतीने खर्च झाल्याचे दिसत नाही. सावंतवाडी बस स्थानकात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आणि त्याचा रोष ते आमच्यावर व्यक्त करत आहेत. त्यामुळे येथील बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे बुजवून तो सुस्थितीत करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच कोरोना नंतर तब्बल दीड दोन वर्षांनी शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांची एसटी विना गैरसोय होणार नाही, याची एसटी महामंडळाने खबरदारी घ्यावी, त्यासाठी योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 13-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here