शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला?, ‘या’ तारखेला सोहळा होण्याची शक्यता

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 19 जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

18 जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठीची निवडणूक होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार, याच्या प्रतिक्षेत अवघा महाराष्ट्र होता. महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होतंय, कोणतं खातं कुणाला मिळेल, याचे आडाखे बांधले जात होते. अखेर 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे-भाजपची यादी तयार?
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या तगड्या आमदार आणि मंत्र्यांसोबत मिळून भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. आता भाजपमधील प्रभावी आमदार आणि शिंदे गटातील आमदार या दोन्हींतून निवडक आमदारांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळपदी वर्णी लागेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेकदा बैठका झाल्या आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरही मंत्र्यांची नावं फायनल करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून मंत्र्यांची लीस्ट तयार असून ती 19 तारखेला जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:19 PM 13-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here