रत्नागिरी : कोरोना बाधित एका रुग्णाची टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याने आता रत्नागिरी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. संचारबंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून प्रत्येक तालुक्यात शिवभोजन सुरु करण्यात येणार आहे. बाहेरून आलेल्या कामगारांसाठी शेल्टर कँप करण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
07:54 PM 30/Mar/2020
