रोहित शर्मानं पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं..

0

इंग्लंडविरुद्ध लंडनच्या द ओव्हाल स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान एक अशी घटनाही घडली, जिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. भारताचा कर्णधार रोहित शर्मा नं मारलेल्या षटकार स्टँडमध्ये बसलेल्या एका छोट्या चिमुकलीला लागला. त्यानंतर रोहित शर्मानं संबंधित चिमुकलीची भेट घेऊन तिला चॉकलेट आणि टेडी बिअर गिफ्ट केली.

नेमकं काय घडलं?
या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत इंग्लडला अवघ्या 110 धावांत गुंडाळलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मानं 58 चेंडूत 76 धावांची भागेदारी केली. या खेळीदरम्यान त्यानं पाच षटकार आणि सहा चौकार मारले. मात्र, यापैकी एक षटकार स्टँडमध्ये बसलेल्या चिमुकलीला लागला. भारताच्या डावातील पाचव्या षटकादरम्यान ही घटना घडली. त्यावेळी मुलीच्या जवळच्या लोकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही सेकंदातचं इंग्लंडच्या फिजिओंनी संबंधित मुलीकडं धाव घेतली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला जास्त दुखापत झाली नसून ती पूर्णपणे बरी आहे. मारी साळवी असं त्या मुलीचं नाव असून ती 6 वर्षाची आहे.

भारतानं पहिला एकदिवसीय सामना जिंकला
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला 119 धावांत गुंडाळलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:13 PM 13-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here