अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून होणारी प्रवाशांची अवैध वाहतून रोखणार : विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक

0

रत्नागिरी : मुंबई, पुणे सारख्या अनेक शहरातून रत्नागिरीत येण्यासाठी काही नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्णवाहिका, दुधाची गाडी यांमध्ये बसून काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. मात्र अशा पद्धतीने चालणारी वाहतून रोखणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यामध्ये आजवर कायदा भंग केल्याचे ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी ऑनलाईन पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हा पास लवकरात लवकर मिळावा यासाठी १९ पोलीस कर्मचारी या कामासाठी कार्यरत करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
08:15 PM 30/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here