रत्नागिरी : जिल्हाभरात आता कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. आणीबाणीच्या काळातील परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ना. उदय सामंत यांनी तालुक्यातील जेएसडब्लू कंपनीकडून व्हेंटिलेटर यंत्रणेची मागणी केली होती. या मागणीला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या काही दिवसातच जिल्हा शासकीय रुग्णालयाला जेएसडब्लू कंपनीकडून ४ व्हेंटिलेटर यंत्रणा दिल्या जाणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
08:37 PM 30/Mar/2020
