शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाची मोठी गर्दी

0

रत्नागिरी : शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांचा वाढदिवस काल मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. बिपीन बंदरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या तेली आळी येथील निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती.

दिवसभर प्रत्यक्ष भेटून तर काहींनी फोन वरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या गर्दीत ठाकरे आणि शिंदे गट देखील प्रकर्षाने उठून दिसत होता. शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांचा रत्नागिरी शहरात दांडगा संपर्क आहे. संघटनात्मक पातळीवर देखील त्यांचा मोठा प्रभाव आहे. रत्नगिरी शहरातील ९९ टक्के माजी नगरसेवक देखील सामंत बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात मोठी उलतापालथ होण्याची दाट शक्यता आहे.

कोण उद्धव साहेबांसोबत व कोण बाळासाहेबांसोबत याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काल दिवसभरात बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या साऱ्या माजी नगरसेवकांनी बिपीन बंदरकर यांना प्रत्यक्ष भेटून तर एक दोन माजी नगरसेवकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. काल दिवसभर बिपीन बंदरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी पहावयास मिळाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 14-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here