रत्नागिरीत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे येत्या शुक्रवारी (दि. १५ जुलै) शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनांकडून तीनशेहून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, आयटीआय, इंजिनिअर आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर लॉगिन होऊन Job Fair टॅबमध्ये Job Fair Event > select District > Action Participation > मधून ज्या पदासाठी अर्ज करावयाचा असेल, त्या उद्योजकाच्या समोर Apply या बटणवर क्लिक करावे. तसेच १५ जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीसाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राकडील ओळखपत्र, शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे, त्यांच्या छायाप्रती आणि पासपोर्ट आकाराचे फोटो यांच्यासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक (०२३५२) २२१४७८ किंवा २९९३८५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:18 PM 14-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here