नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन ‘सेंटॉरस’ व्हेरिएंट

0

नेदरलँड : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आणखी एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार समोर आला आहे. BA.2.75 सब व्हेरिएंट, ज्याला सेंटॉरस असे नाव देण्यात आले आहे. नेदरलँडमध्ये हा नवीन व्हेरिएंट सापडला आहे.

या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार नॉर्थईस्ट गेल्डरलँड प्रांतात घेतलेल्या नमुन्यात आढळला आहे.

फ्रान्स प्रेसच्या एजन्सीनुसार, डच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने बुधवारी ही माहिती दिली. या प्रकाराविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, हे अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट केले होते की, त्या या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या प्रकाराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये म्यूटेशन झाल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेत BA.5 व्हेरिएंटची प्रकरणे वाढली
दरम्यान, कोरोना विषाणूच्या अत्यंत संसर्गजन्य BA.5 व्हेरिएंटमुळे अमेरिकेत संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या व्हेरिएंटमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण 65 टक्के आहे, तर 16 टक्के लोकांना BA.4 ची लागण झाली आहे. काही आठवड्यांत, नवीन ओमायक्रॉन सब-व्हेरियंटसह रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. राज्य आणि शहर प्रशासनासोबतच व्हाईट हाऊसही याला सामोरे जाण्यासाठी नवीन पावले उचलत आहे.

भारतात सर्वात आधी आढळला
जागतिक आरोग्य संघटनेतील कोव्हिड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांच्या मते, सेंटॉरसचा सब व्हेरिएंट मे महिन्यात पहिल्यांदा भारतात आढळले होते. त्यानंतर हा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, युनायटेड किंगडम, यू.एस. आणि जपानसह इतर 14 देशांमध्ये आढळला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:58 PM 14-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here