नाणीजमध्ये 10 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा

0

नाणीज : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमेला आखणी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

महामार्गावरील वाढते आपघात व त्यातील जखमींकडे लोकही दुर्लक्ष करतात. त्यामुळे जखमी तिथेच विव्हळत पडतात. काहींना केवळ वेळेत उपचार न झाल्याने प्राण गमवावे लागतात. अशा अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू व्हावेत अशी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची कल्पना होती. त्यातून एक जुलै 2010 मध्ये ही संस्थानची मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु झाली. आत्तापर्यंत 27 रुग्णवाहिका सेवेत होत्या. त्यात आता आणखी दहाची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची संख्या 37 झाली आहे.

आतापर्यंत या 27 रुग्णवाहिका वेगवेगळ्या महामार्गावर कार्यरत आहेत. आताअखेर त्यांनी अपघातातील 17 हजारावर जखमींना जवळच्या दवाखान्यात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले आहेत. यासाठी एक रुपयाही त्या रुग्णांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतला जात नाही.

ही यंत्रणा आणखी कार्यक्षम करण्यासाठी नव्याने 10 रुग्णवाहिका या यंत्रणेत सहभागी झाल्या आहेत. त्याचे लोकार्पण आज दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी रुग्णवाहिकेचे सर्व दाते, संस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.

या रुग्णवाहिका ज्या दात्यांनी संस्थानला दान करून त्यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. हे दाते असे -1) सौ. रेखा रामराव लहाणे व श्री रामराव देवजी लहाणे, रा. मुंबई. 2) अमोल केशव पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजया अमोल पाटील, रा. वसई. 3) सौ व श्री महेंद्र विलास निकम, रा. बेंगलोर. 4) श्री व सौ. वंदना दिलीप घुले, रा. पुणे. 5) सौ. व श्री तिरूपती व्यंकट रेड्डी, रा. बेंगलोर. संस्थानतर्फे या सर्व दात्यांचा संतपीठावर प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जगद्गुरू नरेंद्राचायजी महाराज यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘या रुग्णवाहिका निश्चितच समाजाच्या उपयोगी पडतील. अनेक जखमींचे प्राण वाचवतील. त्यातून रुग्णवाहिका दात्यांना मिळणारे पुण्य फार मोठे आहे. कारण मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे.’’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:19 PM 14-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here