शरद पवार गुरुसमान, ते दुखावले असल्यास घरी जाऊन माफी मागायला तयार : दीपक केसरकर

0

मुंबई : मी शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरले नाहीत. शिवसेनेत जी फूट पडली त्यासंदर्भात वस्तूस्थिती होती त्याचा उल्लेख केला होता. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यानी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झालं होती. या सर्व घडलेल्या घटना आहेत,या घटनांचा आणि शरद पवार यांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काहीही संबंध येत नाही. ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्याबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं दीपक केसरकर म्हणाले.

मी आजपर्यंत जी वक्तव्य केली आहेत ती तपासून पाहा. शरद पवार महाराष्ट्राचे भारताचे नेते आहेत. ते मला गुरुसमान आहेत, मी त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोललो नाही, लोकांना माझ्याविरुद्ध भडकवलं जात आहे. शरद पवार मला गुरुसमान आहेत, ते दुखावले असल्यास माफी मागतो. माझी वक्तव्य तपासून पाहा, तसं झालं असेल तर सार्वजनिक जीवनातून राजीनामा देईन, असं दीपक केसरकर म्हणाले.

जितेंद्र आव्हाड मला नारायण राणेंच्या मुलांचा प्रचार करा हे सांगायला आले होते, ते शरद पवार यांचा निरोप घेऊन आले नव्हते. शरद पवार सावंतवाडीला आले त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात होतो. मी राणेंच्या मुलांचा प्रचार करु शकत नाही हे सांगत मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या नावानं शरद पवार यांच्याकडे दिला होता. शरद पवार यांनी माझा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यानंतर शरद पवार सिंधुदुर्गात आले होते पण त्यावेळी मला स्टेज येऊ नका असा निरोप देण्यात आला होता. पण, तो शरद पवारांनी दिला नव्हता, असं दीपक केसरकर म्हणाले. मी शरद पवार यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, असं दीपक केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपच्या लोकांनी बोलू नये, असं मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोललो होतो. किरीट सोमय्या देखील आता उद्धव ठाकरेंबाबत बोलत नाहीत. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासायला जा, असं म्हणाले. सिंधुदुर्गातील एकाही शिवसैनिकानं याबाबत आक्षेप घेतला नाही. आम्ही संघटनेत नेत्यावर निष्ठा ठेऊन काम करतो.बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणं उद्धव ठाकरेंचं मोठेपण असावं. उद्धव ठाकरेंबाबत भाजप नेत्यांनी बोलू नये असं वाटणं ही माझी एकट्याची जबाबदारी नाही. तो विषय मी सोडून दिलेला आहे. मी काय उद्धव ठाकरेंचा प्रवक्ता नाही शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे. नारायण राणे खालून वर आलेले नेते आहेत, मला त्यांच्याशी काम करायला अडचण नसल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:35 PM 15-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here