२५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मिळावे; केंद्र सरकारकडे मागणी

0

राज्यात लॉकडाऊनमुळे पूर्णपणे अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र हे पाठवले आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:16 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here