कोकण रेल्वेचाही पंतप्रधान निधीसाठी पुढाकार

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉगडाऊन सुरु आहे. कोरोना विरूध्द लढण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी अनेक कंपन्या, संस्था, सेलिब्रेटी पुढे येत आहेत. कोकण रेल्वेनेही मदतीकरिता पुढाकार घेतला असून कोकण रेल्वेच्या सीएसआर मधून कोरोना विरूध्द लढण्याकरिता पंतप्रधान निधीत कोकण रेल्वेने एक कोटी सहा लाख रूपयांची मदत देणार आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार कोरोना विरूध्दच्या लढ्याकरिता पंतप्रधान निधीत जमा करणार आहे. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम 79 लाख 50 हजार रुपये आहे. त्यामुळे, एकूण कोकण रेल्वेकडून कोरोना विरूध्द लढण्यासाठी 1 कोटी 85 लाख 50 हजाराची मदत होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:38 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here