दापोली विधासभा क्षेत्रातील मुंबईवासीय शिवसैनिकांचा आज जाहीर मेळावा

0

दापोली : शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रातील दापोली, मंडणगड, खेड येथील मुंबईवासीय शिवसैनिकांचा मेळावा शनिवारी १६ रोजी सायंकाळी ५ वा. छबिलदास शाळा, इमारत दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आयोजित मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते, माजी आमदार सूर्यकांत दळवी मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, नवी मुंबई,ठाणे पालघर येथे राहणारे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना दापोली विधानसभाक्षेत्र कार्यकारिणी मुंबई यांनी केले आहे. दापोली मतदारसंघातील आ. योगेश कदम हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर दापोली मतदारसंघातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाठीशी भक्कम उभे रहावेत म्हणून या मेळाव्याचे आयोजन मुंबई कार्यकारिणीने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 16-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here