गरजूंना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून सहकार्याचा हात

0

रत्नागिरी : लॉकडाउनमुळे सध्या हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी अनेक पुढारी, संस्था पुढाकार घेत आहेत. त्याचप्रमाणे करोनाच्या लॉकडाउनमुळे चिंतित ४०० गरजूंना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने मानवतावादी योगदान म्हणून स्वरूप भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली, असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने कोकणातील आर्थिक विश्वात बलाढ्य ताकद निर्माण केली. त्याच बळावर सामाजिक बांधिलकीचा मूलमंत्र जपत आपली जबाबदारी पार पाडत गरजेनुसार सहकार्याचा हात पुढे करायचा, हे धोरण पतसंस्थेने स्वीकारले आहे. गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी शहरातील ४०० व्यक्तींपर्यंत स्वरूप भेट योजनेमार्फत आठ दिवसांचा शिधा पोहोचविण्यात आला. रत्नागिरी शहरात हे वितरण झाले. आता राजापूर आणि लांजा येथेही स्वरूप भेटीचे वितरण केले जाईल, असे पटवर्धन यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:33 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here