रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण बरा झाला असून जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता शून्यावर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव करोनाबाधित रुग्ण रोगमुक्त झाला असून त्याला आणखी दोन दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याचे तपासणीचे नमुने पुन्हा एकदा प्रयोगशाळेत पाठवून तो करोनामुक्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला घरी पाठविण्यात येणार आहे. परदेशातून आलेला हा रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रहिवासी आहे. त्याला रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती सुधारत होती. त्याच्या स्वॅबचे नमुने आता पूर्णपणे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तो रोगमुक्त झाला आहे. मात्र त्याला आणखी दोन दिवस निगराणीखाली ठेवण्यात येईल. त्यानंतरच त्याला घरी जाऊ देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:55 AM 31-Mar-20
