जिल्ह्यात आपले सरकार पोर्टलच्या ४९१ केंद्रांचे कामकाज सुरळीत

0

रत्नागिरी : नागरिकांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळावीत, यासाठी राज्य सरकारने आपले सरकार पोर्टल सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यात ५२७ केंद्रांना मंजुरी मिळाली असून ४९१ केंद्रांचे कामकाज सुरळित सुरू आहे, तर ३६ केंद्रांवर ऑपरेटरअभावी कामकाज खोळंबले आहे.

राष्ट्रीयता प्रमाणपत्र, कृषि दाखला, जन्म दाखला, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यांसह विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी अर्जदारांना तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामधून लोकांची सुटका व्हावी, यासाठी आपले सरकार ही सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मोठ्या लोकसंख्येची गावे किंवा कमी लोकसंख्येची अनेक गावे एकत्र येऊन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ही सेवा चार वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटरचीही नेमणूक झाली. त्यांना आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून दिले जाते .हे केंद्र सुरू करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला संबंधित ग्रामपंचायतीकडून १२ हजार ३३१ रुपये दरमहा महिन्याला भरले जातात. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील लोकांची सोय झाली. रांगांमध्ये तासनतास उभे राहण्यापासून सुटका झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here