खेड : तालुक्यातील गुणदेनजीक रविवारी २९ रोजी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर झाड कोसळले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी वृद्ध इसमाचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील गुणदे नजीक आत्माराम तुकाराम आंब्रे (वय ६५) व तुषार आत्माराम आंब्रे (वय ३०) हे बाप-लेक दुचाकीवर बसून २९ रोजी जात असताना गुणदे हायस्कूलच्या आवारातील मोठे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु वृद्ध आत्माराम आंब्रे यांचे उपचारादरम्यान निधन झाले तर तुषार याला पुढील उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:00 PM 31-Mar-20
