शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी रवींद्र इनामदार

0

रत्नागिरी : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी रवींद्र इनामदार, तर सचिवपदी गणपती एडवी यांची निवड करण्यात आली.

ही निवड शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी विनायक हातखंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

माजी विद्यार्थी मंडळाची उर्वरित कार्यकारिणी अशी : कोषाध्यक्ष-विजय वाघमारे, सदस्य-रवींद्र पाटणकर, अनंत जाधव, सौ. रेखा इनामदार, सौ. अस्मिता मजगावकर, संदीप कांबळे, संतोष गार्डी, निनाद तेंडुलकर, संदेश रहाटे, सौ. रजनी पेजे, सौ पूजा कात्रे. सल्लागार – विनायक हातखंबकर, चंद्रमोहन देसाई, समन्वयक -डॉ. तारासिंग नाईक. मानद अध्यक्ष म्हणून प्राचार्या-डॉ. रमा भोसले यांची निवड करण्यात आली.यावेळी डॉ. रमेश भोसले, डॉ. ज्योत्स्ना ठाकूर, डाॅ. मस्के, डॉ. राजश्री देशपांडे, प्रा. उज्वला ढोणे, प्रा.चाकोते उपस्थित होते.

मंडळ गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहील. शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन, क्रीडास्पर्धा आणि इतर उपक्रम राबविले जातील, असे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी सांगितले. सचिव गणपती एडवी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here