राजापूरात सलग पाचव्या दिवशी आलेल्या पुराची आणि पुरपरिस्थितीची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पहाणी केली. राजापूर शहरातील पुरपरिस्थितीची माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या होडीत बसून पुराच्या पाण्यातुन शहरात फिरून यावेळी त्यांनी पहाणी केली. तर मुंबई गोवा महामार्ग वरचीपेठ येथील ब्रीटीश कालीन पुल व रानतळे येथील खचलेल्या रस्त्याचीही पहाणी केली. याप्रसंगी रविवारी अर्जुनेच्या पुराच्या पाण्यात बुडणाºया केसीसी कंपनीच्या कामगाराला वाचविणाºया प्रज्योत खडपे व शिवा खानविलकर यांचे चव्हाण व डॉ. मुंढे यांनी अभीनंदन केले.
राजापूर शहरात गेले पाच दिवस अर्जुना व कोदवली नदीच्या पुराचे पाणी तळ ठोकून आहे. मंगळवारी पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे हे राजापूरात दाखल झाले व शहरातील पुरपस्थितीची पहाणी केली. याप्रसंगी विधानपरिषद सदस्या अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे, नगराध्याक्ष अॅड. जमिर खलिफे यांसह प्रांताधिकारी प्रविण खाडे, तहसीलदार सौ. प्रति•ाा वराळे, राजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, मुख्य लिपीक किशोर जाधव, आरोग्य विभागाचे दिलीप पवार, जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी काझी यांच्या होडीने पुराच्या पाण्यातुन प्रवास करत शहरातील पुरपरिस्थितीची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याशी चर्चा केली व प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी वरचीपेठ पुल व रानतळे रस्त्याची पहाणी केली.
