आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणेसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती होणेबाबत आ. राजन साळवी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना विनंती

0

➡ निवेदनाला महाराष्ट्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

रत्नागिरी : सध्या कोरोना व्हायरस या आजारावर उपचार करणेसाठी व नियंत्रण ठेवणेसाठी जिल्हयातील आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यरत असुन ते करत असलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. परंतु जिल्हयातील जिल्हा शासकिय रुग्णालयामध्ये तसेच उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये अपु-या असलेल्या डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन व वार्डबॉय आदी कर्मचारी वर्गामुळे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांवर प्रचंड ताण पडत आहे. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणेसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करणेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, ही विनंती मेल द्वारे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांचे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना राजेशजी टोपे ह्यांना निवेदनाद्वारे विनंती होती त्याचे फलित म्हणून आज महाराष्ट्र शासनाने लवकरच आरोग्य विभागामध्ये मेगा भरतीचे संकेत दिले असून त्याबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात येतील असे सूचित केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:00 PM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here