पत्रकार परिषद घेऊन कान टोचल्यावर जिल्ह्यातील कंपन्या मदतीसाठी पुढे आल्या

0

रत्नागिरी : ‘ज्या मातीत पैसे कमावता तिच्यासाठी काहीतरी करा’ अशा परखड शब्दात ना. उदय सामंतांनी कान टोचताच जिल्ह्यातील काही कंपन्या मदत देण्यासाठी पुढे आल्या आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी अनेक उपकरणांची गरज जिल्हा प्रशासनाला आहे. आवाहन न करताच यासाठी जिल्ह्यातील सर्व कंपन्यांनी पुढे येणे आवश्यक आहे असे मत ना. उदय सामंत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केले होते. अनेक कंपन्यांना याची जाणीव होत या कंपन्यांकडून लाखो रुपयांचा निधी आता जिल्हा प्रशासनाकडे गोळा झाला आहे. या निधीतून व्हेंटीलेटर यंत्रणा सुसज्ज केली जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:05 PM 31/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here