तरुणाचा प्रामाणिकपणा; ५० हजार रोकड असलेली बॅग मालकाकडे केली सुपूर्द

0

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पूर्णगडच्या आवारामध्ये रोख रुपये ५०००० असलेली बॅग श्री गुरुप्रसाद पद्माकर तोडणकर यांना सापडली. या बॅगेचे मूळ मालक शोधून तोडणकर यांनी बॅग त्यांना परत केली. तोडणकर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे गावखडी पंचक्रोशीत कौतुक होत आहे. कामावर कार्यरत असताना तोडणकर यांना ५० हजार असलेली बॅग सापडली. बॅजबाबात अधिक चौकशी केली असता ही बॅग येथील श्री महेश्वर फडके यांची असल्याचे समजले. सदरची बॅग तोडणकर यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली बँकेचे हर्षकुमार पाली (मॅनेजर), प्रशांत अंभोरे (ऑफिसर), शेखर पावसकर (कर्मचारी), आणि मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत बॅग मालकाकडे सुपूर्द केली.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:32 PM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here