मुंबई विद्यापीठाने घेतली गोगटेच्या प्रा. रोकडे यांच्या साहित्याची दखल

0

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रा. तुळशीदास रोकडे लिखित ग्रंथाचा संदर्भ साहित्य म्हणून समावेश केला गेला आहे.

‘चळवळ: एक सैद्धांतिक आणि समीक्षात्मक विश्लेषण’ या ग्रंथाचा समावेश पूरक अभ्यास संदर्भ म्हणून मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष समाजशास्त्र विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमासाठी झाला आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यरत प्रा. रोकडे यांचे सदर पुस्तक चळवळीचे समाजशास्त्र या विषयासाठी उपयुक्त असून सामाजिक शास्त्रातील अनेक उपघटकांशी ते निगडित आहे. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी कलाशाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी आणि सहकार प्राध्यापक यांनी प्रा. रोकडे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here