रोहा-चिपळूण मेमू गाडीला 12 डबे जोडणार

0

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण या मार्गावर 01157 / 01158 क्रमांकाची मेमू विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत धावेल. या गाडीला ८ ऐवजी १२ डबे जोडण्यात येणार आहेत.

सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. याआधी काही वर्षांपूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र रोह्याच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे. याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01157/01158 क्रमांकाची रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. ही गाडी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी रोहा येथून सुटेल आणि दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.

कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने ही गाडी सोडणे शक्य होणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:15 PM 18-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here