मध्यप्रदेश बस अपघात: हेल्पलाईन नंबर्स जारी

0

मुंबई : मध्यप्रदेशातील धार येथे इंदूर-अंमळनेर एसटी-बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय.

तर अनेक जण बेपत्ता आहेत. या अपघातानंतर एसटी महामंडळाने 022- 23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत केलाय. यासोबतच जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत.

इंदोर अमळनेर बस मध्यप्रदेशच्या खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर अपघातग्रस्त झाली असुन मदत कार्य सुरु आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तसेच जळगाव जि का नियंत्रण कक्षाशी 02572223180/02572217193 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाशी संपर्कात असून शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेशातील बस अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून, स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये नमूद केलेय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:30 PM 18-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here