Breaking: शिवसेना अजूनही एनडीएतच, एकनाथ शिंदे समर्थक खासदारांचा दावा, शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नसल्याचा दावा

0

नवी दिल्ली : शिवसेना अजूनही एनडीए मध्येच आहे, असा पवित्रा एकनाथ शिंदे यांना समर्थन करणाऱ्या शिवसेना खासदारांनी घेतला आहे. एनडीएच्या सभासदत्वाचा राजीनामा शिवसेनेने दिलेला नाही, असा त्यांचा युक्तिवाद असणार आहे.

अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रीपद सोडलं, शिवसेना यूपीएचा घटक नाही, असा शिंदे गटातील खासदारांचा दावा आहे. शिंदे गटाच्या आजच्या खासदारांच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. संसदेमधील गटनेता केवळ बदलला जाणार आहे, त्या जागी राहुल शेवाळे हे नवे गटनेते असतील. पक्षप्रतोदी भावना गवळी कायम राहणार आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:21 PM 18-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here